सोलापूर शहरातील प्रस्तावित दोन उड्डाणपूल
सोलापूर शहरातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचेकडून सेक्शन-1 जुना पुना नाका
ते पत्रकार भवन चौक (एकूण लांबी 5.45 कि.मी.) तसेच सेक्शन-2 जुना बोरामणी नाका ते मोरारका बंगला
(एकूण लांबी 5.00 कि.मी.) असे दोन उड्डाणपुल प्रस्तावित आहेत. महाराष्ट्र शासनाच्या दि.17.10.2018 रोजीच्या शासन निर्णयानुसार सदर प्रकल्पासाठी महाराष्ट्र
सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेतून मंजूर करणेत आलेला असून, सुधारित आराखड्यानुसार
भूसंपादनासाठी र.रु.145.11 कोटी इतका खर्च येणार आहे. शासन हिस्सा 70%(रु.101.577 कोटी) व
महापालिका हिस्सा 30% ( र.रु. 43.53 कोटी) मंजूर करण्यात आलेली आहे. मनपा हिस्सा भरणेकामी
र.रु.1.67 कोटी विशेष भूसंपादन अधिकारी विशेष घटक, सोलापूर यांचेकडे
वर्ग करण्यात आली आहे. MUIDCL या वित्तीय संस्थेकडून र.रु.11.20 कर्ज व र.रु.4.80
अनुदान असे एकूण र.रु.16.00 कोटी इतकी रक्कम महानगरपालिकेस प्राप्त झालेली आहे.
वरीलप्रमाणे म.न.पा.हिस्सापोटी र.रु.1.67 कोटी व र.रु.16.00 कोटी पैकी 11.95 कोटी
असे एकूण र.रु.13.62 कोटी इतकी रक्कम विशेष भूसंपादन अधिकारी विशेष घटक, सोलापूर
यांचेकडे वर्ग केली आहे. तसेच उड्डाणपुल भूसंपादन सेक्शन-1 करीताचे सुमारे 90% निवाडे
जाहीर करण्यात आलेले आहेत व इतर कामे प्रगतीपथावर आहेत.