समित्या
महानगरपालिका ही प्रत्यक्ष प्रभाग निवडणूकामध्ये थेट निवडून आलेले सदस्य व नामनिर्देशित सदस्याची बनलेली आहे.
थोडक्यात महानगरपालिकेचे कामकाज महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे, नविन कर विद्यमान, करामध्ये बदल करणे, धोरणात्मक निर्णयाना मंजुरी देणे, प्रशासकीय कामकाजावर देखरेख करणे, माहिती विकास योजना, पायाभूत सुविधा रस्ते, पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन आदी पायाभूत सुविधा पुरविणे, आदींचे कामकाज महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार तसेच शासनाच्या वेळोवेळी निर्देशानुसार कामकाज चालते.
परिवहन समिती:-
सोलापूर महानगरपालिकेने परिवहन उपक्रम स्थापन केल्याने परिवहन समिती यामध्ये एकुण 12 सदस्य आहेत व मा.स्थायी समितीचा सभापती हा परिवहन समितीचा पदसिद्ध सदस्य असतो असे एकुण 13 सदस्य असतात.
स्थायी समिती:-
महानगरपालिकेतील सदस्यापैकी 16 सदस्यांची नेमणूक स्थायी समिती सदस्य म्हणून केली जाते. या सदस्यामधून एकाची सभापती म्हणून निवड केली जाते. स्थायी समिती ही महानगरपालिकेची अर्थ मंत्रालयासारखी कार्यकारी संस्था आहे. आर्थिक व्यवहार, कामास मंजुरी, खर्च यावर सर्वात मोठा अधिकार या समितीकडे असतो. या समित्यांचे कामकाज महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम व शासनाच्या वेळोवळी निर्देशानुसार चालते.
अ.क्र |
विशेष समितीचे नाव |
थोडक्यात कार्यक्षेत्रची माहिती |
१ |
स्थापत्य समिती |
- नगर स्थापत्य प्रमुख यांचा विभाग व तत्संबंधी सर्व प्रश्न.
- मार्ग, भवने, पाणी पुरवठा आणि जलशाळा (वॉटर वक्र्स), खुली
मैदान व उद्याने, अग्निशामक दल, कर्मशाळा, यांत्रिक
स्थापत्याची शाखा आणि स्थापत्य विभागातील इतर कामे.
- सार्वजनिक सुरक्षितता आणि सुखसोयी संबंधी इतर प्रश्न
- भूमी आणि जिंदगी विभाग व तत्संबंधी सर्व प्रश्न
- कामांची तपासणी आणि आवश्यकता वाटेल त्यावेळी महापालिका
आयुक्त यांच्याकडून निवेदने मागविणे.
|
२ |
शहर सुधारणा समिती |
शहराच्या सर्वसाधारण सुधारणासंबंधी तसेच निर्देशक योजना (मास्टर प्लॅन) नगररचना योजना, औद्योगिक वसाहती, गृहनिर्माण योजना या संबंधीचे सर्व प्रश्न. |
३ |
वैद्यकीय सहाय्य आणि आरोग्य समिती |
महानगरपालिकेची बाह्य औषधालये, रुग्णालये (सांसर्गिक रोग्यांचे
रुग्णालय धरुन), प्रसुतिगृहे, वैद्यकीय आणि शुश्रुषात्मक सहाय्य
आरोग्य विभाग, रस्ते सफाई, कचरा वाहतुक. |
४ |
मंडई आणि उद्याने विभाग |
मंडई आणि उद्याने यासंबंधीचे सर्व प्रश्न |
५ |
विधी समिती |
महानगरपालिकेच्या कारभारासंबंधी, महानगरपालिका अधिनियम आणि इतर अधिनियम, पोटनियम, विनिमय, नियम यातील तरतुदींचा अर्थ लावण्याबाबत आणि त्यामधील सुधारणा बाबत उपस्थित होणारे प्रश्न. |
६ |
कामगार व समाज कल्याण समिती |
महानगरपालिकेच्या मजुरांचे कल्याणा विषयी व तसेच स्थानिक मजूर वर्गाचे करमणुकीसाठी मदत करण्याचा प्रयत्न करणे आणि तत्सम सोयी, सर्वसामान्य कामकरी वर्गाला उपलब्ध करून देणेचे दृष्टीने काम पाहणे. |
७ |
महिला व बालकल्याण समिती |
महिला व बालकल्याण विभागासंबंधी कामे |
८ |
अंतर्गत तक्रार समिती (विशाखा समिती) |
अंतर्गत तक्रार समिती मार्फत, कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळापासुन महिलांना संरक्षण देणे, लैंगिक छळास प्रतिबंध करणे आणि अशा तक्रारींचे निराकरण करणे, भरपाई देणे, संबंधित अपचारी / प्रतिवादी यांचे विरुध्द संपुर्ण चौकशी अंती योग्य त्या कारवाईबाबत अहवाल पाठविणेबाबत सदर कायद्याअंतर्गत तरतुद आहे.
कामाचे ठिकाणी सुरक्षित वातावरण हा या कायद्याचा प्रमुख उद्देश आहे. |
वर नमूद सर्व सभा/समित्यांचे कामकाज हे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार तसेच शासनाच्या वेळोवेळी निर्देशानुसार कामकाज चालते.