सोलापूर स्मार्ट सिटी प्रकल्प
सोलापूर स्मार्टसिटीच्या माध्यमातून जवळपास 47 प्रकल्प शहरात सुरु होते त्यापैकी
46 प्रकल्प पूर्ण झाले आहेत. त्यापैकी 40 प्रकल्प मनपाकडे हस्तांतरीत करणेत आलेले आहेत.
स्मार्ट सिटी अंतर्गत इंदिरा गांधी स्टेडियम सुसज्य झाले असून त्याठिकाणी रणजी सामने घेण्यात आले भविष्यात
याठिकाणी आय. पी. एल. सामने घेण्याचा प्रयत्न राहील. स्मार्टसिटी अंतर्गत शहरातील वाहतूक व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन,
आपत्ती व्यवस्थापन इत्यादी सेवा सुरळीत व सुरक्षा आबाधित राखण्याकरीता इंटिग्रेटेड कमांड ऍण्ड कंट्रोल सेंटर कार्यान्वित झाले आहे.
यामध्ये सी.सी.टी.व्ही., एल.ई.डी. दिवे, कचरा संकलन केंद्राच्या गाड्या पाणीपुरवठा
वितरण स्काडा प्रणाली, शहरातील ड्रेनेज, अग्निशामक विभाग पोलिसांकडील
आवश्यकत्या सुविधांचे एकाच ठिकाणाहून देखरेख करण्यात येत आहे.
तसेच सोलापूर महानगरपालिका व स्मार्टसिटीच्या माध्यमातून शहरातील 14 दहनदफन भूमिंचे विकासाचे काम पूर्ण झाले आहे.
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी व विविध योजनेतून 2.7 MW चे सोलार प्रकल्प सुरु असून,
आजवर सुमारे 4 कोटी वीज बिल बचत झाली आहे. तसेच आजला प्रतिमहा र.रु.30 लाख इतक्या रकमेची वीज बिलांची
बचत होत आहे. EESL कंपनी व स्मार्ट सिटी मार्फत शहरातील 55490 एल.ई.डी. दिवे व नव्याने 3650
विद्युत खांब बसविण्यात आले आहेत, त्यामुळे दरमहा सुमारे 81.20 लाख रुपये विजबील बचत होत आहे.
शहरातील ऐतिहासिक व सुरेख अशी मनपाची इंद्रभुवन इमारतीचे पुर्नररुज्जीवन
करणेचे काम स्मार्ट सिटी योजने अंतर्गत पूर्ण झाले आहे. सदर ठिकाणी नियोजनाप्रमाणे
शासकीय कार्यालय कार्यान्वित आहेत. या इमारतीमध्ये भारतीय घटकांच्या मिश्रणासह लेट
बरोक किंवा रोकोको सारख्या काळातील विद्यमान युरोपियन शैलींचा स्पष्ट प्रभाव दिसून येतो.
पश्चिम युरोपीय देशांमध्ये लोकप्रिय व्हिला संकल्पना इमारतीच्या एकूणच वैशिष्ट्यातून स्पष्ट होते.