रमाई आवास योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी घरकूल योजना
सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौद्ध व्यक्तींना पक्की घरे तसेच कच्च्या घरांचे पक्के बांधकाम करता येईल.
तसेच शासकीय अभिरनामार्फत र. रू.2.5 लाख दि.9 मार्च 2010 या शासन निर्णयाद्वारे अनुदान उपलब्ध करून देण्यात येते.
सन 2023-24 सालमध्ये 464 लाभार्थ्यांची यादी मंजूर करण्यात आली असून र.रु.11.60 कोटी अनुदान प्राप्त झाले आहे.
सदर यादीमधील 464 लाभार्थी पैकी 132 लाभार्थ्यांना घरे पूर्ण झालेली आहेत.
तसेच पहिला व दुसरा हप्त्याचे अनुदान 99 लाभार्थ्यांना वितरित करण्यात आलेले आहे व उर्वरित लाभार्थ्यांचे प्रकरण प्रगतीत आहेत.