पर्जन्य जलवाहिन्या सुधारणा करणे
सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात अतिवृष्टीमुळे आपातकालीन परिस्थिती निर्माण होते
शहरातील सर्व पर्जन्य जलवाहिन्या तुडूंब भरुन वाहून, विविध भागामध्ये पावसाचे पाणी शिरते सोलापूर शहरात अतिवृष्टीमुळे उद्भवणाऱ्या आपातकालीन परिस्थितीचा विचार करता शहरातील पर्जन्य जलवाहिन्यांची सुधारणा करणे आवश्यक आहे. सोलापूर शहरात ठिकठिकाणच्या पर्जन्य जलवाहिन्या सुधारणा करणे या कामाचे एकूण 20 नाल्यांचे
अंदाजपत्रक र.रु.98.91 कोटीचे तयार केले असून त्यास म. जी. प्रा.ने तांत्रिक मंजूर दिली आहे व
त्यास शासनाकडून दि.18.06.2024 रोजी मंजूरी प्राप्त झाली असून कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे.