महात्मा गांधी प्राणी संग्रहालय येथे विविध विकास कामे करणे
केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण यांनी दि.28.12.2021 रोजीच्या आदेशान्वये वन्यजीव
संरक्षण कायदा 1972 च्या कलम 38 एच पोट कलम 6 च्या तरतूदीनुसार महात्मा गांधी प्राणी
संग्रहालयाची मान्यता रद्द करताना Recognition of Zoo Rules, 2009 मधील मानकांचे उल्लंघन होत असल्याबाबत कळविण्यात आले असून त्यामध्ये एकूण 45 त्रुटींची पूर्तता करणेबाबत सांगण्यात आले होते. त्याअनुषंगाने प्राणीसंग्रहालयाशी निगडीत प्रलंबित बाबींची पूर्तता करुन कायदेशीर मान्यता पुर्नस्थापित करणेकामी प्राणिसंग्रहालय मधील काही नवीन आवश्यक स्थापत्य विषयक बाबींची पूर्तता करणे तसेच व्हेटरनरी हॉस्पिटल बांधणे इत्यादी कामे करणे बाबत प्रादेशिक पर्यटक विकास योजना सन 2024-25 अंतर्गत निधी मंजूरीकरीता व प्रशासकीय मंजूरी करीता र.रु.2,95,41,932/- इतक्या रकमेचा निधी डी.पी.डी.सी. मधून प्राप्त करुन घेतला.