नागरी दलित वस्ती सुधारणा योजना
नागरी दलित वस्ती सुधारणा योजना जिल्हास्तरीय व विशेष घटक लाभार्थीसाठीची
योजना असल्याने योजनेच्या तरतूदी विशेष घटक योजनेच्या जिल्हा वार्षिक योजनेमधून
उपलब्ध केल्या जातात. या अंतर्गत सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये ज्या भागामध्ये
अनुसूचित जातीचे नागरीक यांची लोकसंख्या 50% पेक्षा जास्त आहे त्याभागातील नागरिकांचे
राहणीमान उंचाविणेकरीता सदर योजनेअंतर्गत रस्ते, पोचरस्ते, जोडरस्ते, रस्त्याचे डांबरीकरण,
सिमेंटीकरण, नाही बांधकाम, लहान नाल्यावर फरशीकरण करणे, विहिरी दुरुस्ती, छोटे पुल
बांधणे, पाण्याच्या पाईपलाईनची कामे (हप्सा, पाण्याची टाकी) सार्वजनिक उपयोगासाठीची
कामे इत्यादी कामे येतात. या अंतर्गत सदर योजनेमधून सन 2022-23 सालात र.रु.31.98
कोटी व सन 2023-24 सालात र.रु.34.67 कोटी इतक्या रकमेची प्रशासकीय मान्यता प्राप्त
कामे प्रगतीत असून त्यातील काही कामे पूर्ण झालेली आहेत.