सी. एस. आर. निधीतून लोकोपयोगी कामे
केंद्र व राज्य शासन व मनपा स्वनीधी सोबतच उद्योजकांचा सी. एस. आर. फंडामधूनही
लोकोपयोगी कामे मनपाच्या माध्यमातून करण्यात येत आहेत. बालाजी अमाईन्सच्या सहकार्याने डफरीन चौकातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रसुतीगृहाचे अत्याधुनिकीकरण र.रु. 1.50 कोटी इतकी निधी खर्चून पूर्ण झाले आहे. याठिकाणी रात्रंदिवस रुग्णांना कॉर्पोरेट हॉस्पिटल सारख्या आरोग्य सेवा विनामूल्य पुरविण्यात येत आहे. महिलांची
सुलभ प्रसुती, सिझेरियन शस्त्रक्रिया कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया नियमित करण्यात येत आहे. दि. 28 फेब्रुवारी 2023 ला लोकार्पण करण्यात आले असून आजतागायत 302 सिझेरियन शस्त्रक्रिया साधारण प्रसुति 1558, लेप्रोस्कोपी 1609, बाह्यरुग्ण 31800 व अंर्तरुग्ण 6025 इत्यादींनी लाभ घेतला आहे.
बँकेच्या सी. एस. आर. फंडामधून कॅम्प प्रशालेत र.रु. 1.50 कोटी खर्चून त्याठिकाणी
क्रिडांगण विकास करणे सुसज्य स्वच्छतागृहे, रंगरंगोटी, छत दुरुस्ती अशी कामे पूर्ण होऊन
त्याचा लाभ 1700 हून अधिक विद्यार्थी घेत आहेत. तसेच बँकेच्या सी. एस. आर. फंडातून 350 सायकल वाटप करणे तसेच उद्यानात खेळणी उभा करणे अशी कामे करण्यात आली. बालाजी अमाईन्स कंपनीमार्फत र.रु.1.00 कोटी फंडातून रुपाभवानी स्मशानभूमी येथे विद्युतदाहिनी करीता शेड, श्रध्दांजली सभागृहाकरीता वेटिंग हॉल, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, हातपाय धुण्याकरीता स्वतंत्र हँडवॉश सेंटर, विद्युतदाहिनी परिसरात छोटे उद्यान इत्यादी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. बालाजी अमाईन्स कंपनीमार्फत सोलापूर
महानगरपालिकेकडील दाराशा मॅर्टिनिटी हॉस्पिटलचे नुतनीकरण करणेचे काम चालू आहे.
यासाठी सुमारे 90 लाख सी. एस. आर. निधी खर्च करण्यात येत आहे.