अमृत योजना
केंद्र शासन पुरस्कृत अमृत- 1 अभियान अंतर्गत सोलापूर शहर भुयारी गटार योजनेचा मंजूर प्रकल्प खर्च र.रु.180.24 कोटी ड्रेनेजसाठी पाठपुरावामुळे UIDF अंतर्गत योजनेसाठी
र.रु.96.61 कोटीचे कर्ज मंजूर असून त्यास दिनांक 25.09.2017 रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. सदर योजनेचा सुधारित खर्च र.रु. 185.01 कोटी इतका आहे. सदर योजनेअंतर्गत शहरात एकूण 246 किलोमिटरचे ड्रेनेज लाईन टाकण्यात येत असून, देसाई
नगर येथील 20 एमएलडी मलशुध्दीकरण केंद्राचे काम प्रगतीपथावर आहे. सदर प्रकल्पाचे उर्वरीत काम पूर्णत्वास आहे.
केंद्र शासन पुरस्कृत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर)
अंतर्गत सोलापूर शहर भुयारी गटार योजनेचा संभाव्य खर्च र.रु.433.69 कोटी असून या
योजनेअंतर्गत एकूण 207.54 किलोमिटरचे ड्रेनेज लाईन तसेच देगाव येथील 49 एमएलडी
मलशुध्दीकरण केंद्र प्रस्तावित आहेत. सदर प्रकल्पास प्रशासकीय मान्यता दि.20.02.2024 रोजी प्राप्त झाली असून, निविदा अंतिम करुन कामाचे वर्कऑर्डर दि. 12.10.2024 रोजी
देण्यात आलेले आहे. केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 अंतर्गत र.रु.882.69 कोटीचा सोलापूर
शहर अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचा डी. पी. आर. तयार केला असून, मान्यतेसाठी शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे. या कामातून हद्दवाढसह संपूर्ण शहराचे ड्रेनेज नेटवर्क पूर्ण होणार आहे.