स्वच्छ सर्वेक्षण
स्वच्छ भारत अभियान 2023 मध्ये सोलापूर शहराने आपल्या स्वच्छतेच्या क्रमवारीत लक्षणीय सुधारणा केली असून पूर्वीच्या 88व्या क्रमांकावरुन राष्ट्रीय स्तरावर 63 व्या व राज्यस्तरावर 17 व्या स्थानावरून 14 व्या स्थानावर पोहोचले आहे. सोलापूर शहराने 3 स्टार
कचरामुक्त रेटींग मिळविले आणि सलग तिसऱ्यांदा ODF ++ स्थिती राखली. कचरा संकलन व
वाहतूक करण्यासाठी 35 सी. एन. जी. वाहने आणि 06 सी. एन. जी. रिफ्युज कॉम्पॅक्टर खरेदी करण्यात आले असून, आय. टी. सी. आधारीत घरोघरी QR कोडवरील कचरा संकलन निरिक्षण प्रणाली लागू केली आहे.