आरोग्य सुविधा पोटी आयुष्यमान आरोग्य मंदिर उभारणे
सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील व इतर नागरीकांना उत्तम व तत्पर आरोग्य सेवा उपलब्ध करुन देणेकामी 15 व्या वित्त आयोग अंतर्गत मंजूर आयुष्यमान आरोग्य मंदिर (UHWC) PORTA CABIN मध्ये उभारणेबाबत कार्यवाही ठेवण्यात येत आहे. सोलापूर
शहरामध्ये 23 ठिकाणी जेथे मनपा इमारती उपलब्ध नाहीत तेथे ACP Panel Steel Porta Cabin उभारणेचे काम चालू आहे.
सोलापूर मनपाच्या माध्यमातून जनसेवा हिच ईश्वरसेवा हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून
चौफेर क्षेत्रात सेवा देण्याचे व विकास करण्याचे काम यापुढेही कायम राहील.
सर्व संबंधीत, अर्थसंकल्पीय तरतुदीप्रमाणे आपापली जबाबदारी निष्ठेने पार पाडतील
याबद्दल मला विश्वास आहे. सर्व संबंधीतांनी याकामी केलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचे आभार
मानतो.